तोच धागा आज पुढे चालू ठेवणार आहे
पहिल्या विचार वाटिकेत आपण ज्ञान आणि बुद्धी यावर विचार केला आता आज आपण विद्या आणि कला या गोष्टी विचारात घेणार आहोत
"कट्यार काळजात घुसली " या नाटकातील एक पात्र " राजकवी कविराज " म्हणतात कि,
" कला हि माणसाला आपल्या बरोबर स्वर्गातून आणावी लागते आणि विद्या हि येथून घ्यावी लागते .
कलेचा अंकुर हा तिथून येतानाच फुटावा लागतो पण विद्येचा अंकुर हा भूतलावर रुजवावा लागतो "
विद्या किंवा बुद्धी किंवा ज्ञान हे स्व कष्टातून निर्माण करावे लागते तर कला हि फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते.
विद्या हि आपल्याला जगण्या साठी काय करावे हे शिकवते तर कला हि का जगावे हे सांगते.
या तिन्ही गोष्टी म्हणजे "ज्ञान", "विद्या" वा "बुद्धी" आणि "कला" या एकमेकांना पूरक अशा आहेत या तिन्हींचा संगम चमत्कार घडवू शकतो.
गान सम्राज्ञी लता मंगेशकर, विश्वनाथन आनंद, सचिन तेंडूलकर, हि यांची काही उदाहरणे आहेत
आज आपण विज्ञान निष्ट जगात राहतो तर आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होईल कि काय मोठे ज्ञान कि विज्ञान या संदर्भातील एका अनुभव माझ्या कडे आहे
पुणे नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्कार प्रदान करताना "बाबामहाराज साताळकर" म्हणाले होते कि,
"ज्याठिकाणी विज्ञानाचे अस्तित्व संपते त्या ठिकाणी ज्ञानचा उगम होतो."
विज्ञानाने माणूस तर्कट होतो तोच मनुष्य ज्ञानाने तर्कसुसंगत विचार प्रवाह निर्माण करू शकतो
याचे उत्तम उदाहरण म्हणजे "Socretis " हा होय. त्याने अनेक पद्धतीचे विचार ग्रीक लोकांच्या मनात निर्माण केले व शेवट पर्यंत करत राहिला व त्यासाठी त्याने देहदंडाची शिक्षा हसत हसत कबूल केली.
हा विषय याच पद्धतीने पुढेही वाढवता येईल मी इथेच थांबू इच्छितो पण जर कुणाला या विषयावर अधिक बोलायचे असेल तर त्याचे नक्कीच स्वागत होईल
कळावे
तुमचा मित्र
अमित गावडे