About Me

My photo
क्षणा क्षणा नि "ज्ञान" आणि कणा कणा नि धन जोडता येते या उक्तीवर सार्थ विश्वास असणाऱ्या माणसानी तयार केलेला ब्लॉग

Sunday, August 15, 2010

"ज्ञान" विचार शलाका पुढे चालू ......

मित्रानो प्रथमता मी काल ब्लॉग मांडू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे .

तोच धागा आज पुढे चालू ठेवणार आहे 

पहिल्या विचार वाटिकेत आपण ज्ञान आणि बुद्धी यावर विचार केला आता आज आपण विद्या आणि कला या गोष्टी विचारात घेणार आहोत 

"कट्यार काळजात घुसली " या नाटकातील एक पात्र " राजकवी कविराज " म्हणतात कि, 
" कला हि माणसाला आपल्या बरोबर स्वर्गातून आणावी लागते आणि विद्या हि येथून घ्यावी लागते .
कलेचा अंकुर हा तिथून येतानाच फुटावा लागतो पण विद्येचा अंकुर हा भूतलावर रुजवावा लागतो "

विद्या किंवा बुद्धी किंवा ज्ञान हे स्व कष्टातून निर्माण करावे लागते तर कला हि फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते.
विद्या हि आपल्याला जगण्या साठी काय करावे हे शिकवते तर  कला हि का जगावे हे सांगते.

या तिन्ही गोष्टी म्हणजे "ज्ञान", "विद्या" वा "बुद्धी" आणि "कला"  या एकमेकांना पूरक अशा आहेत या तिन्हींचा संगम चमत्कार घडवू शकतो.

गान सम्राज्ञी लता मंगेशकर, विश्वनाथन आनंद, सचिन तेंडूलकर, हि यांची काही उदाहरणे आहेत 

आज आपण विज्ञान निष्ट जगात राहतो तर आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होईल कि काय मोठे ज्ञान कि विज्ञान या संदर्भातील एका अनुभव माझ्या कडे आहे 

पुणे नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्कार प्रदान करताना "बाबामहाराज साताळकर" म्हणाले होते कि,
"ज्याठिकाणी विज्ञानाचे अस्तित्व संपते त्या ठिकाणी ज्ञानचा उगम होतो."

विज्ञानाने माणूस तर्कट होतो तोच मनुष्य ज्ञानाने तर्कसुसंगत विचार प्रवाह निर्माण करू शकतो 
याचे उत्तम उदाहरण म्हणजे  "Socretis " हा होय. त्याने अनेक पद्धतीचे विचार ग्रीक लोकांच्या मनात निर्माण केले व शेवट पर्यंत करत राहिला व त्यासाठी त्याने देहदंडाची शिक्षा हसत हसत कबूल केली.


हा विषय याच पद्धतीने पुढेही वाढवता येईल मी इथेच थांबू इच्छितो पण जर कुणाला या विषयावर अधिक बोलायचे असेल तर त्याचे नक्कीच स्वागत होईल 

कळावे 
तुमचा मित्र 

अमित गावडे 

Friday, August 13, 2010

" ज्ञान "

ज्ञान म्हणजे काय ?
आदर्श मराठी कोश या बद्दल सांगतो कि " एखाद्या विषयाचे आकलन करण्याचे सामर्थ्य "

ज्ञान साधनेच्या कार्यात एकून तीन गोष्टींचा अंतर्भाव होतो
१) प्रज्ञा :ज्ञान ग्रहण  करण्याची शक्ती
२)मेधा : ज्ञान धारण करण्याची शक्ती
३)प्रतिभा : नव नवीन कल्पना सुचण्याची शक्ती

या तीनही गोष्टी व्यक्ती सापेक्ष असतात.

आपण बर्याचदा बुद्धी आणि ज्ञान याची गल्लत करतो

बुद्धी हि प्रज्ञा आणि मेधा यांच्या सहकार्याने कार्य करते तर ज्ञाना साठी केवळ प्रतिभेची गरज असते.

प्रत्येक ज्ञानी मनुष्य हा बुद्धिमान असतोच असे नाही तसेच बुद्धिमान मनुष्य हा  ज्ञानी असतोच असे नाही.

काही लोकांना असामान्य बुद्धिमात्तेची देणगी लाभलेली असते ती माणसे इतरांना योग्य मार्गावर आणून सोडायचे काम करतात. उदाहरण द्यायचे झाले तर स्वामी विवेकानंद , चिंतामणराव देशमुखांनी देशाची अर्थ व्यवस्था  घडवली हि माणसे एकदा वाचलेली गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवत.

तर काही लोक हे कष्ट घेउन आपल्यात कमी असलेली बुद्धिमत्तेची उणीव भरून काढतात याचे उदाहरण द्यायचे तर डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर ते २४ पैकी २१ तास अभ्यास करत त्यामुळे ४ वर्षे चालणारा अभ्यासक्रम त्यांनी २.५ वर्षात पूर्ण केला व याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपली राज्य घटना लिहिली.

बुद्धिमत्ता हि सर्वाना समप्रमाणात वाटलेली आहे पण आपली आवड व आपला एखाद्या विषयातील रस या गोष्टी वर आपण कोणत्या गोष्टीचे ज्ञानं आर्जीत करू शकतो ते ठरते.

समजा आपण गृहीत धरले कि देव हा बुद्धीची वाटणी करतो आहे तर तो दुजा भाव कशाला करेल त्याची नक्कीच अशी इच्छा नसणार कि काही लोकांनी बुद्धिमान बनावे व बाकीच्यांनी नांदी बैला सारख्या माना डोलवाव्यात.

त्यामुळे एक लक्षातघ्या कि आपण आपल्या कष्टांच्या जोरावर बुद्धि अर्जित करू शकतो व बुद्धीचा योग्य व सद्सद्विवेक वापर हा तुमची ज्ञानाची पातळी दर्शवतो.

आजच्या साठी एवढेच
याचवरचे वेगळे आयाम उद्या हाताळूयात तो पर्यंत

शुभ रजनी
अमित गावडे

Thursday, August 12, 2010

खटाटोप कशासाठी?

"विचारवाटिका" अर्थातच (Blog) सुरु करण्याचे कारण काय ? हा प्रश्न मला ओळखणाऱ्या बर्याच लोकांना पडेल कारण हा माणूस एक तर इतकी बडबड करत असतो आता ते कमी कि काय म्हणून स्वताची विचारवाटिका सुरु करावीशी वाटली.

आपण कणा कणा ने धन आणि क्षण क्षणाने ज्ञान जोडू शकतो पण या दोन्ही गोष्टींचा उपयोग आपण जेव्हढा जास्त करू तेव्हढ्या या गोष्टी आपल्याला जास्त होवून परत मिळतात.

गोसावी सर म्हणतात तसे "गावडे, आपले ज्ञान हे नेहमी दुसऱ्याला दिले पाहिजे!" 

बास आणि फक्त या उद्देशानेच या विचार वाटीकेची सुरुवात करत आहे.

दररोज एका नवा अनुभव तुम्हाला येथे वाचायला मिळेल पाहूयात हा प्रकार कुठ पर्यंत चालतो आहे ते !

तुम्हाला कुठल्या गोष्टी विषयी माहिती हवी असेल तर नक्की विचार ती देण्या साठी सगळे प्रयत्न होतील हे नक्की ! 

कळावे 
लोभ असावा 

तुमचाच मित्र 
अमित गावडे