About Me

My photo
क्षणा क्षणा नि "ज्ञान" आणि कणा कणा नि धन जोडता येते या उक्तीवर सार्थ विश्वास असणाऱ्या माणसानी तयार केलेला ब्लॉग
Showing posts with label शब्दोत्सव. Show all posts
Showing posts with label शब्दोत्सव. Show all posts

Saturday, October 29, 2011

शब्दोत्सव

नमस्कार मित्रानो,
आज फार दिवसांनी परत एकदा ब्लॉग वर माहिती टाकायची नव्हे मांडण्याची संधी आली आहे. कालच खरे तर विक्रम नाम संवत २०६८ सुरु झाले. खरे तर दिवाळी म्हणजे गोड धोडाची रेलचेल आणि झकास मध्ये निरनिराळ्या ठिकाणचे नवनवीन लेख.
त्यातीलच एका लेख मध्ये असे वाचनात आले कि दिवाळी जेव्हा येते तेव्हा खरे तर आपल्याला नवीन वर्षाची चाहूल लागलेली असते आणि जर नवीन वर्षाचे नियोजन आता पासूनच सुरु केले तर आपल्याला खूप गोष्टी योग्य त्या पद्धतीने करता येतील.
मध्यंतरी या ब्लॉग वर काही लेख टाकता आले नव्हते पण आता इथून पुढे शक्य तितका प्रयत्न राहील कि सतत काहीतरी नवीन या ब्लॉग च्या वाचकांना मिळत राहील. या ब्लॉग चा एकमेव उद्धेश हा आहे कि फक्त ज्ञान वाटत राहणे आणि हि दिवाळी ते पुढची दिवाळी हा शब्दोत्सव सतत साजरा करत राहायचे आणि त्यात नाविन्य नक्कीच मिळत राहील.
याची सुरुवात हि मी एका गोष्टी पासून करणार आहे जो माझा सगळ्यात आवडता प्रांत आहे.
गोष्टीचे नाव आहे "कढी"
आपल्या सर्वाना अकबर बिरबलाची हि गोष्ट माहित आहे ज्यामध्ये बादशहा अचानक विचारतो आणि काय होत बिरबल तो हि त्याच हजरजबाबी पणाने सांगतो कि महाराज फक्त कढी होती या वर खुश होउन बादशहा त्याला as usual दहा मोहरा भेट देतो.
आता तो काळ मागे गेला मित्रानो आणि आता आपल्याला पदोपदी असे कात्रीत पकडणारे भरपूर जण भेटतात त्या सगळ्यांना जर पुरून उरायचे असेल तर आपल्याला हि कढी कायम लक्षात ठेवावी लागणार आहे.
मित्रानो गोष्टी जुन्याचा आहे चला आता त्या नवीन चष्म्यातून पाहू खूप काही वेगळे दिसेल हे नक्की.